ठाकरे साहेबांनी कोरडया विहिरीतही उडी मारायला लावली तरी मारेन-अंबादास दानवे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |   पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे सांगतील ते मी करायला तयार आहे. त्यांनी उद्या कोरड्या विहिरीत उडी मारायला लावली तरी मी मारेन, असं वक्तव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. पक्ष प्रमुखांनी लोकसभा लढायला लावली तर तीही लढेन, असंही ते म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

ठाकरेंनी कोरड्या विहिरीत उडी मारायला सांगितली तर त्याची देखील माझी तयारी आहे. त्यामुळे उमेदवारीचा तर प्रश्नच येत नाही. त्यांनी लोकसभा लढण्यास सांगितलं तर मी निवडणूक नक्की लढवेन, असं दानवे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते लोकसभेसाठी इच्छूक असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

चंद्रकांत खैरे आमचे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण आदर मला आहे. त्यांची फारशी चिंता शिरसाट यांनी करण्याची गरज नाही. त्यामुळे कोणीही उमेदवार दिला, तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. त्याला निवडून आणू. याबाबत कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही, असं दानवे म्हणाले.

 

Protected Content