राष्ट्रीय स्टेकींग स्पर्धत आदिवासी विद्यार्थीने पटकावले तीन कांस्यपदक

शिफा तडवीचे राष्ट्रवादीने केले अभिनंदन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडीया रोलर स्पीड स्टेकींग स्पर्धा २०२२ या स्पर्धत शिफा तडवी या विद्यार्थिनीनं उत्कृष्ठ कामगिरी करत तीन कांस्यपदक मिळवले आहे.

येथील आदीवासी चळवळीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदीवासी तडवी भिल एकता मंचचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी यांची नात शिफा राजीव तडवी हिने नुकतीच नागपूर येथील गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कुलमध्ये भारताचे क्रिकेटपटू एम.एस.धोनी यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडीया रोलर स्पीड स्टेकींग स्पर्धा २०२२ या स्पर्धत शिफा तडवी हिने उत्कृष्ठ कामगिरी करत तीन कांस्यपदक मिळवले आहे.

ही स्पर्धा तिन विभागात विभागली गेली होती. या प्रत्येक विभागात पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, भुसावळ येथे शिक्षण घेत असतेली आदीवासी कुटुंबातील शिफा तडवीने कांस्यपदक पटकाविले आहे.

राष्ट्रीय पातळीच्या स्पर्धत तिने मिळवलेल्या या यशाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, राष्ट्रवादीचे अरूण लोखंडे, पत्रकार अय्युब पटेल, पत्रकार सुनिल गावडे, मानिष तडवी आदींनी तिचे अभिनंदन करत तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: