कोरोनाकाळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या ; पालकमंत्र्यांना निवेदन

 

  यावल : प्रतिनिधी । कोरोनाकाळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्या अशी मागणी राज्य सरकारकडे करणारे निवेदन आज या कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांना दिले

 

एक वर्षापासुन कोरोना विषाणुसंसर्गाच्या काळात सातत्याने  कंत्राटी पद्धतीवर सेवेत  असतांना कोरोना रुग्णांना उल्लेखानिय सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे अशी या महामारी योद्धा संघर्ष सामितीची  मागणी आहे

 

शासनाने कोवीड१९च्या पार्श्वभुमीवर राज्यभरात डॉक्टर , स्टाफ नर्स , औषधनिर्माता, स्टोअर अधिकारी, डेटा एन्ट्री परिचालक  , कक्ष सेवक , रुग्णवाहीका चालक , सफाई कामगार , सुरक्षा रक्षक व तत्सम पदांची विहीत शैक्षणिक अर्हता , अनुभव आणी गुणवत्तेनुसार कत्रांटी , हंगामी व रोजंदारी पद्धतीने भरती केलेले आहेत .

 

हे सर्व कर्मचारी कर्तव्याचे प्रामणिक निर्वहन करत असंख्य जीवांचे रक्षण करीत आहेत . रुग्णसेवा करतांना अनेक कोरोना योद्धांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत / होत आहेत . यात काही कोरोना योद्धांनी प्राण देखील गमावले आहे . सर्वजण   एक वर्षापासुन आरोग्य विभागात कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत . मार्च २०२०पासुन कोरोना विभाग तसेच विलगीकरण कक्ष जळगाव जिल्ह्यात कार्यरत आहे

 

यावल तालुक्यातील  जे टी महाजन महाविद्यालय न्हावी , ग्रामीण रुग्णालय न्हावी , सातपुडा डि.सी.एच .सी येथे नविन कर्मचारी न भरता कंत्राटी पद्धती सातत्याने सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोवीड कर्मचाऱ्यांना संधी देवुन समर्पित कोवीड केअर सेन्टर येथे शासकीय सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांना महामारी योद्धा संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या निवेदेनात करण्यात आली आहे

 

या निवेदनावर अनिल महाजन , शकील तडवी, सोनाबाई धनगर ,रुखसाना तडवी, सोनाली राणे , काजल वाघ , दिनेश महाजन . आशा भालेराव , सहानी बारेला, प्रविण लोधी , युगल जावळे , गुलशन तडवी , सलमा तडवी , सचिन पाटील , योगिता शिंदे , डॉ . अमीन तडवी , शितल सोनवणे यांच्यासह अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या  सह्या   आहेत .

 

Protected Content