प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय – संतोष माळी

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर नवीन नियुक्ती करतांना मला विश्वासात न घेता मला पदावरून पायउतार करणे म्हणजे नवीन आयारामासाठी निष्ठवंतावर अन्याय झाला आहे. स्थानिक राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची ही मनोपॉली जास्त दिवस चालणार नाही. या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांना लवकरच भेटणार आहे. तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनाही संपूर्ण लेखाजोखा पाठविणार असल्याचे संतोष माळी यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांची घुसमट आणि मुस्कटदाबी होत आहे. नवीन पक्षात आलेल्या आयारामसाठी मला सात्यत्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डावलले. राष्ट्रवादीमध्ये नव्याने दाखल झालेल्याना आगामी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून माझ्या ऐवजी नव्या आयारामाना निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष्याकडून संधी देण्यासाठी माझ्यावर अन्याय केला आहे. पक्षाचे काम विधानसभा निवडणूक असो लोकसभा निवडणूक असो झालेल्या मागच्या पंचवार्षिक नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक इमाने इतबारे काम केले हा माझा गुन्हा आहे का? मी कोणत्याही निवडणुकीत विरोधी भाजपाला जिवंत ठेवण्यासाठी मदत केली नाही. किंवा विरोधी पक्षासोबत घरोबा केला नाही. तरीही मला पक्षाच्या पदावरून का पाय उतार केले. हे विचारण्यासाठी कार्यकर्ते घेऊन जिल्हाध्यक्ष यांच्याकडे जाणार आहे. आयारमासाठी जर पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची पदावरून न विचारता विश्वासात न घेता असे पाय उतार होत असेल तर जनता येणाऱ्या निवडणुकीत कशी काय राष्ट्रवादी पक्षा बरोबर असेल? ज्या आयारामांसाठी स्थानिक पदाधिकारी इतके त्यांच्याशी जुडवून घेत आहे. तर त्यांच्या मनात राष्ट्रवादी पक्ष आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार आहेत का? ही आत्मचिंतनची नितांत गरज आहे.

मी कधीही पक्ष विरोधी काम केलं नसतांना माझ्यावर झालेला हा अन्याय म्हणजे सामन्य जनतेवर झालेला अन्याय आहे. मागच्या पंचवार्षिक नगरपरिषद निवडणुकीत माझी पत्नी शैला संतोष माळी यांनी भाजपाच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. कठीण काळात भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आणि वरणगावात पक्ष वाढीसाठी मी जीवाचे रान केले आहे. आणि आज तेच कालचे विरोधक पक्षात आले. आणि त्यांना परत त्या पदावर नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून बसविण्यासाठी माझ्या सारख्या प्रामाणिक माळी समाजाच्या कार्यकर्त्यावर हा एका प्रकारे अन्यायच झाला आहे. या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना लवकरच भेटणार आहे. तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनाही संपूर्ण लेखाजोखा पाठविणार असल्याचे संतोष माळी यांनी सांगितले.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!