डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात एव्हरयुथ स्कीन आणि लेझर क्‍लिनीकचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  टॅटू, मस, तीळ, जन्मजात व्रण आणि डाग काढण्याची आधुनिक सुविधा आता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात त्वचारोग विभागांतर्गत एव्हरयुथ स्कीन आणि लेझर क्‍लिनीकचे महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात फित कापून उद्घाटन करण्यात आले.

 

खान्देशसह विदर्भातील गरजू रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय धर्मार्थ रूग्णालयातर्फे विविध प्रकारच्या आजारांवर आधुनिक उपचार पध्दती उपलब्ध करून दिली जाते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण त्वचेविषयी अधिक जागरूक असतात. मात्र खात्रीशीर उपचाराच्या सुविधा तोकड्या आणि खर्चिक स्वरूपाच्या असल्याने अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा सर्व रूग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात आता एव्हरयुथ स्कीन आणि लेझर क्‍लिनीकचा शुभारंभ चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्तेकरण्यात आला. यावेळी उपचारासाठी आवश्यक असलेल्या तीन आधुनिक मशिनची महाविद्यालयाचे अधीष्ठाता  डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. ए.जी. बडगुजर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी त्वचारोग तज्ञ डॉ. पंकज तळेले, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. दिनेश कुलाल, डॉ. चेतना शंकलेशा, डॉ. सारा खान,. डॉ. सागरिका धवन, नर्सिंग विभागाच्या अश्‍विनी टोणपे, वरीष्ठ अकाऊंटंट रमाकांत पाटील, अजय वाणी, प्रशासन अधिकारी अशोक भिडे, अशोक बर्‍हाटे, जितू पाटील, लिपीक सुशील विसपुते, प्रतिभा पाटील आदी उपस्थित होते.

 

असे आहे लेझर क्‍लिनीक

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या लेझर क्‍लिनीकमध्ये क्यू स्वीच एनडीयाग लेझर ही आधुनिक मशिन उपचारासाठी उपलब्ध आहे. अंगावरील टॅटू काढुन टाकणे, जन्मजात खुणा, काळे तीळ काढुन टाकणे आणि त्वचेला उजळवणे हे उपचार या मशिनद्वारे होतात. दुसर्‍या लाँग पल्स एनडीयाग लेझर या मशिनच्या सहाय्याने अंगावरील नको असलेले केस काढता येणार आहे. तसेच सीओ2 लेझर मशिनद्वारे मुरूमानंतरचे व्रण, खड्डे, काळे डाग, कांजण्यानंतरचे डाग, मस काढणे, स्कीन लेझर रिजुव्हीनेशन हे उपचार केले जाणार आहेत. महिला रूग्णांसाठी या क्‍लिनीकमध्ये स्वतंत्र महिला डॉक्टरकडून उपचार केले जाणार आहेत. तसेच हे सर्व उपचार हे सवलतीच्या दरात करण्यात येणार असून गरजू रूग्णांनी या क्‍लिनीकचा लाभ घ्यावा असे आवाहन त्वचारोग तज्ञ डॉ. पंकज तळेले यांनी केले आहे

Protected Content