अट्रावल येथील विकासोची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

यावल – लाईव्ह ट्र्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील अट्रावल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुळ येथील नितीन चौधरी (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, यावल) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वच्या सर्व १३ जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.

बिनविरोध निवडून आलेल्या मध्ये अनुक्रमे सर्वसाधारण गटातून  निळकंठ चौधरी, मधुकर चौधरी, सुनील चौधरी, सुभाष चौधरी, चंद्रकांत महाजन, काशिनाथ महाजन, राजेन्द्र शिंदे, गोविंदा खाचणे, अनुसूचित जाती जमाती तुन भारुडे, भटक्या विमुक्त जातीतून  चुडामण धनगर, ओबीसी मतदार संघातून  नितीन चौधरी, तर महिला राखीव मतदारसंघातून संगीता चौधरी व जयश्री चौधरी या सर्व १३ जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. बिनविरोध निवडीमुळे यावल तालुक्यात नितीन चौधरी यांची गावात वर्षानुवर्षे सर्व संस्थांवर १००% यश संपादन करण्याची परंपरा कायम राहिली आहे.

सदर निवड झाल्याने सर्व उमेदवारांचे रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार  शिरीष चौधरी, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, काँग्रेस कमेटीचे तालुकाअध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे यांचेसह सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच यावल तालुक्यातील नितीन चौधरी यांच्या मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे.

सदर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  आय. बी. शेख साहेब, सचिव  सुरेश मानेकर व इतर कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

 

Protected Content