साकेगावातील सत्कार समारंभात गळून पडल्या राजकीय भिंती !

साकेगाव, ता. भुसावळ-जितेंद्र पाटील | साकेगाव म्हटले की राजकारणाचा कळस ! असे मानले जाते. प्रत्येक बाब येथे राजकीय आयामातूनच पाहिली जाते. मात्र गावात नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात सर्व राजकीय भिंती गळून पडल्याचे दिसून आले असून हे चित्र साकेगावकरांना सुखद धक्का देणारे ठरले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, साकेगाव हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चर्चेला जात असते, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. राजकारणातले राजकीय कट्टर विरोधक एकाच मंचावर आणि वतीला बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी आल्याचे यातून दिसून आले. नुकत्याच साकेगाव येथे अग्नीपंख अकॅडमी या सामाजिक संस्थेने पोलीस भरती प्रशिक्षण असे अनेक उपक्रम हाती घेतले होते. या ठिकाणी गावातील राजकीय स्पर्धक असलेले शकील पटेल व दिलीप सिंह पाटील हे एकाच व्यासपीठावर आले.

खरं तर या दोन्ही मान्यवरांमधील कट्टर राजकीय शत्रूत्व हे सर्वांना माहित आहे. तथापि, या कार्यक्रमात दोन्हींनी एकत्र येत नवीन संदेश दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य रवींद्र पाटील व साकेगाव ग्रामपंचायत चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्यशकील पटेल इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन दिलीपसिंग पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.वास्तविक पाहता हा कार्यक्रम सामाजिक असला तरी आजवर कोणत्याही कार्यक्रमाला एकत्र न येणारे मान्यवर एकाच ठिकाणी आल्याने नवीन समीकरण तर उदयास येणार नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

आगामी काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. यात गावातील राजकीय कट्टरता पुन्हा एकदा वाढीस लागण्याची शक्यता असतांनाच या कार्यक्रमात एकमेकांच्या प्रतिस्पर्ध्यांनी सोबतीला येत एकोप्याचा दिलेला संदेश हा सूचक मानला जात आहे.

Protected Content