तरूणावर ब्लेडने वार करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरूणावर ब्लेडने वार करून फरार झालेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी तांबापूरा परिसरातून रविवारी १८ डिसेंबर रोजी रात्री १० अटक केली आहे. संशयितावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

समीर हमीद काकर रा. अजमेरी गल्ली, तांबापूरा, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अरबाज रउफ खाटीक (वय-२४) रा. जुम्मा शहा वखारजळगाव तांबापूरा, जळगाव येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भंगार खरेदी विक्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. २३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास समीर हमीद काकर रा. तांबापूरा जळगाव याने अरबाजकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. अरबाज खाटीक याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून समीरने हातातील ब्लेडने वार करून कानाला गंभीर दुखापत केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी समीर हमीद काकर हा फरार झाला होता. तीन महिन्यानंतर संशयित आरोपी समीर काकर हा तांबापूरा परिसरात आल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ नितीन पाटील, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, सचिन पाटील यांनी रविवारी १८ डिसेंबर रोजी रात्री कारवाई करत संशयित आरोपी समीर काकर याला अटक केली. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधिश श्रीमती जे.एस.कोरकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड.स्वाती निकम यांनी काम पाहिले. दरम्यान, अटक केलेल्या संशयित आरोपीविरोधात हाणामारी, दारोडा, दंगा यासारखे पोलीस ठाण्यात ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Protected Content