‘ई-पीक पाहणी’ ऍपद्वारे पिक पेरा नोंदवा; आमदारांचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी आज रविवार, दि. २८ ऑगस्ट रोजी ममुराबाद व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन ई-पीक पाहणी ऍपच्या माध्यमातून पेर्‍याची नोंद केली. याप्रसंगी सर्व शेतकर्‍यांनी आपापल्या शेतातील पेरणीबाबतची माहिती भरून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन आमदारांनी केले.

राज्य शासनाच्या महसूल, कृषी विभागामार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकर्‍यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ऍप द्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोन ऍप्लीकेशनची सुधारित २.० आवृत्ती ही दि. १ ऑगस्टपासून सादर करण्यात आली आहे. यात शेतकर्‍यांना एक मुख्य आणि तीन दुय्यम खरीप पिकाची नोंद करण्यची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

या माध्यमातून अगदी अक्षांक्ष व रेखांशनुसार शेतीतील पिकांची नोंद करण्यात येते. या पीक पाहणीत एकदा नोंद केल्यानंतर त्यात बदल करायचा असल्यास ४८ तासांची मुदत देखील देण्यात आली आहे. या सर्व सुविधांचा शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन आ.राजूमामा भोळे यांनी केले.

यावेळी सोबत तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत, नायब तहसिलदार सोनवणे, मंडळ कृषि अधिकारी मनोहर जंगले, कृषी पर्यवेक्षक सचिन बाविस्कर शेतकरी दत्तू चिंतामण कोल्हे, डॉ. विश्वनाथ खडके,प्रमोद काळे, खुशाल चौधरी, अॅड. दिपकराज खडके, प्रमोद नेमाडे, ज्ञानदेव कोल्हे, पंडित तळले, ज्ञानेश्वर कोल्हे, शैलेंद्र चिरमाडे, परेश कोल्हे, भूषण खडके, किशोर झोपे, दयाराम खडके, पिंटू नेमाडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Protected Content