भाजपचे राज्य राजा महाराजांसारखे राज्य- राहूल गांधी

नागपुर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा |  नागपुरात काँग्रसचा १३९ व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो, त्यामध्ये बोलताना राहूल गांधी भाजपवर टीका केली आणि देशात जातीय जनगणना करणार असे आश्वासनही दिली

स्वातंत्र्यापूर्वी भारतात ब्रिटिशांचे राज्य आणि राजेशाही होतं, त्यावेळी राजा म्हणेल  तेच होईल अशीच स्थिती होती, आताही तीच परिस्थिती आहे. कुणाचंच ऐकून घ्यायचं नाही हा नरेंद्र मोदी यांचा स्वभाव आहे अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. पूर्वी दलितांना स्पर्श केला जायचा नाही, ही आरएसएसची विचारधारा आहे, आता देश त्याच मार्गावरून नेला जात असल्याचंही ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, मागे मला एक भाजपचा खासदार भेटला. तो म्हणाले की राहुलजी, मी भाजपमध्ये असलो तरी मला सहन होत नाही, माझं मन काँग्रेसमध्ये आहे. मी म्हणालो की शरीर भाजपमध्ये आहे आणि मन काँग्रेसमध्ये, तर मग काँग्रेसमध्ये यायला मन का नाही होत? त्यावर तो म्हणाला की, भापजपमध्ये गुलामी आहे. वरून आदेश आला की ते करावं लागतं. वरून जो काही आदेश येईल, तो जरी मनाविरुद्धचा असला तरी त्याचं पालन करावं लागतं.

भाजपची कार्यपद्धत ही वरून आदेशाचं पालन करणारी आहे. त्याच्या विरुद्ध अशी काँग्रेसची पद्धत आहे. आमच्या पक्षात साधा कार्यकर्ताही नेत्यांना विरोध करू शकतो. अनेक कार्यकर्ते मला म्हणतात की ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. त्यावर मी त्यांचं ऐकून घेतो. काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही सुरू आहे.

 

Protected Content