Home राजकीय अखेर ‘नॉट रिचेबल’ असणारे अजितदादा आले समोर !

अखेर ‘नॉट रिचेबल’ असणारे अजितदादा आले समोर !

0
33


पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तब्बल १७ तासानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज पुण्यातील एका कार्यक्रमात समोर आले आहेत.

 

या संदर्भातील वृत्त असे की, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासह सात आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. पवार यांनी काल दुपारी दोनच्या सुमारास आपला शासकीय ताफा सोडून खासगी कारमधून निघून गेले होते. यानंतर त्यांचा संपर्क क्रमांक सुध्दा बंद होता.

 

यानंतर राज्यातील अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याबाबत समाजमाध्यमातून भाष्य केल्याने गोंधळ वाढला होता. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत ही स्थिती कायम होती. यानंतर अजित पवार हे आपल्या सौभाग्यवतींसह पुण्यातील एका ज्वेलर्स शॉपच्या उदघाटनाला दिसून आले. आपली प्रकृती बरी नसल्याने आपला संपर्क क्रमांक बंद होता अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. आपल्याला जागरणामुळे पित्त जास्त झाले असल्याने संपर्क होत नव्हता अशी माहिती देखील त्यांनी दिली.


Protected Content

Play sound