साकळी येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांतर्गत मोफत तांदूळाचे वितरण

यावल प्रतिनिधी । संपूर्ण देशात कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लावण्यात आली आहे. कोणाचीही उपासमार होवू नये यासाठी शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांतर्गत तालुक्यातील साकळी येथे गरजूंना मोफत तांदूळाचे वाटप करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांतर्गत यावल तालुक्यातील साकळी येथील दुकान नं.३५ आणि ३६ या दोन्ही स्वस्त धान्य दुकानात लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप करण्यास सुरूवात झाली आहे. प्रति व्यक्तीस ५ किला प्रमाणे तांदूळ वाटप करण्यात येत आहे.

यावेळी जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी साकळीचे ग्रामविकास अधिकारी डी.आर.निकुंभ, तलाठी व्ही.एस.वानखेडे, कोतवाल गणेश माळी, ग्रा.पं.वरिष्ठ लिपिक पंढरीनाथ माळी, कनिष्ठ लिपिक बाळकृष्ण तेली यांचेसह संबंधित कर्मचारी उपस्थित होते. या वाटप दरम्यान ‘सोशल डिस्टिंक्शन’चे काटेकोरपणे पालन करण्यात आले. शासनाच्या वतीने हातावर पोट असणाऱ्या गरीब नागरिकाना प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ वाटप झाल्याने लाभार्थ्यांना मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content