यावल-भुसावळ रस्त्यांवर पुन्हा पडले खड्डे; वाहनधारकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल-भुसावळ मार्गावरील जुना भुसावळ नाक्यापासुन काही अंतरापर्यंत काही दिवसापुर्वीच तयार केलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने ठेकेदाराने केलेल्या कामाची गुणवत्ता ही केवळ देखाव्याची असल्याची संत्पत भावना वाहनचालक व नागरिक करीत असुन पुनश्च अशा निकृष्ठ प्रतिच्या या कामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची निष्क्रियता समोर आली आहे.

यावल ते भुसावळ या अतिश्य वाहनांची वर्दळ असलेल्या मार्गावरील जुना भुसावळ नाका ते पर्यंतच्या रस्त्याची सांडपाणी व ईतर कारणांनी गेल्या काही वर्षापासुन फारच बिकट अवस्था झाली होती. याबाबत नागरीकांनी वारंवार या रस्त्यावर होणारे अपघात व समस्यांबाबत संबधीत विभागाकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. दरम्यान उशीरा का होईना अखेर प्रशासनाला जाग आली व त्यांनी लाखो रूपयांचे निधी खर्च करीत रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामास मंजुरी देत काम पुर्ण केले. मात्र सदरचे काम करतांना संबधीत ठेकेदाराने शासकीय निविदा प्रमाणे बांधकाम साहित्य वापराच्या अटीशर्तींचा भंग केल्याने हे कॉंक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ठ प्रतिचे झाल्याचे या रस्त्यावर दोनच महीन्याच्या आत या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर ठीकठिकाणी खड्डे पडल्याचे व काही ठीकाणी रस्ता फाटत असल्याचे दिसून येत असल्याने ठेकेदाराने केलेल्या या कामाच्या गुणवत्तेबद्दल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय कारभाराच्या दुर्लक्षीत पणामुळे तयार झालेल्या या कॉंक्रीट रस्त्याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत असुन काही दिवसातच रस्ता नाहीसा होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. सदरच्या झालेल्या या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी वाहनधारक व नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Protected Content