साई मोरया गृपतर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील साई मोरया गृपतर्फे खोटे नगर घरोघर जाऊन नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी नागरिकांना आर्सेनिक अल्बम औषधींचे वाटप करण्यात येत आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच आहेत.साई मोरया गृपतर्फे खोटेनगर परिसरात शनिवारी नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक कुटुंबासाठी आर्सेनिक अल्बम औषधींचे मोफत वितरण देखील यावेळी करण्यात आले. नागरिकांची स्क्रिनिंग करण्याचा उपक्रम साई मोरया ग्रुपचे उमाकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसन्न जाधव, चेतन हातकर, भटु पाटील, शुभम पाटील, जयेश महाजन, वैभव चंद्रात्रे, धिरज महाजन, निखिल पाटील, अजय मोरे, सुदर्शन ईशी, ज्ञानेश्वर पाटील, यश मराठे हे तपासणी करत आहेत. तसेच या आरोग्य तपासणीस महापालिका कर्मचारी तनुजा पाटील, सविता पालवे, शारदा घोडे यांची मदत होत आहे.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/305550290631178/

 

Protected Content