भव्य कावड यात्रेत पायी वारी करणाऱ्या भक्तगणांना मोफत उपचार व औषध वाटप

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते कावड यात्रेतील पायी वारी करणाऱ्या भक्तांना मोफत औषध वाटप करण्यात आले.

सातपुड्याच्या क्षेत्रात जीन्सी तालुका रावेर येथे आज बुधवार, दि. ०३ ऑगस्ट रोजी जीन्सी मंदिरामध्ये यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हि कावड यात्रा उमा महेश्वर धाम ब्रम्हलीन प.पु.गुरुदेव, श्री महंत श्री श्री १००८ श्री महंत नवरतनगिरीजी महाराज सांबरपाठ जिन्सी येथे ओकारेश्वर (तामसवाडी ) येथून तर कावड यात्रा सांबरपाठ (जिन्सी) पर्यंत काढली जाते. या यात्रेत दुरून भक्तगण पायी वारी (यात्रा ) करत येत असतात. आज सांबरपाठ येथे कावड यात्रेची सांगता झाली. ज्या भक्तांना यात्रेत येताना शरीराला काही दुखापत झाली किंवा ज्यांना शारीरिक त्रास होत होता अशा भक्तांची डॉ. कुंदन फेगडे यांनी मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी केली व मोफत औषध वाटप केले.

याप्रसंगी डॉ. कुंदन फेगडे यांनी मोफत रुग्णसेवा केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Protected Content