निर्दयीपणे गायींना घेऊन जाणाऱ्या वाहनास पोलिसानी घेतले ताब्यात

रावेर, प्रतिनिधी । गायींना अत्यंत निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी विनापरवाना वाहतूक करीत असतांनारावेर तालुक्यातील पाल येथे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी त्या वाहनास पकडून दोघा आरोपींसह गायींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, छोटा हत्ती या वाहनाने गायींना अत्यतं निर्दयपणे कोंबून विना परवाना वाहतूक सुपडू जलदार तडवी (वय 34 वर्ष रा.निमड्या) सैय्यद सरजन सैय्यद मोहंमद रा मारुळ ता. यावल हे करीत होते. गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ पाल गावाजवळ पोलिसांनी ते वाहन थांबविले. त्या वाहनात चार गायी होत्या. एका गायीचे शिंग तुटलेले होते. ती गे रक्तबंबाळ होती. यागयी कत्तलीसाठी मध्य प्रदेशात नेल्या जात होत्या. पोलिसांनी गायी, वाहन व दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहेत. त्या गायींची रवानगी जळगाव येथील बाफना गो शाळेत करण्यात आली आहे. या घटनेची रावेर ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील डीवायएसपी नरेंद्र पिंगळे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनानुसार हे कॉ राजेंद्र राठोड,पो ना अतुल तडवी,पो कॉ संदीप धनगर,पो कॉ नरेंद्र बाविस्कर यांनी केली असून पुढील तपास हे कॉ राजेंद्र राठोड करीत आहेत.

Protected Content