१३० क्विंटल कापूस घेऊन ट्रक चालक बेपत्ता

पारोळा प्रतिनिधी । शहरातून वेगवेगळ्या चार शेतकऱ्यांचा 130 क्विंटल कापूस ट्रक मध्ये घेऊन जाऊन ट्रकचालक हा ठरल्या ठिकाणी न घेऊन जाता कापूस व ट्रकसह बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील योगेश भोसले, पंढरीनाथ पाटील, किशोर दुसाने, नामदेव वाघ(जळगाव) या चारही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 130 क्विंटल कापूस हा गुजरात राज्यातील कडी येथे एपीएमसी मार्केट मध्ये अधिक भाव मिळतो. या उद्देशाने विक्री करण्यासाठी घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी श्रीराम रोडलाईन्स (आकलकुवा) या ट्रान्सपोर्टचा माध्यमातून ट्रक क्रमांक आर जे 22 , 0656 हा ट्रक भाड्याने लावला होता. ट्रक चालक सारवान राम यास ठरलेले भाडे 31000 रुपये पैकी 16000 पोट भाडे देऊन आम्ही खाजगी वाहनाने येतो. असे सांगून पुढे जाण्याची सूचना केली.

15 नोव्हेंबर रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातून निघालेला हा ट्रक दुसऱ्या दिवशीं सायंकाळी कडी येथें पोहचणे अपेक्षित होते. दरम्यान चा काळात या शेतकरी योगेश भोसले वतीने भाऊ महेश भोसले यांनी ट्रक चालकाशी संपर्क साधला असता ट्रकचालकाने आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. परिणामी महेश भोसले यांनी ट्रान्सपोर्ट चे मालक विनोद जैन यांच्याशी संपर्क साधून संबंधित ट्रकचालकाचे माहिती जाणून घेतली. परंतु त्यांचा देखील ट्रकचालकाशी संपर्क झाला नाही. गेल्या तीन दिवसापासून ट्रान्सपोर्टर जैन हे त्या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. परंतु तो आज पावेतो मिळून आला नाही. म्हणून योगेश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक सारवण याविरुद्ध सहा लाख 63 हजार रुपये किमतीचा कापूस फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हे करीत आहे. या घटनेमुळे कापूस व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content