साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकल्याने महिला गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी । कोरोना लस घेण्यासाठी आई व मुलगा दुचाकीने जात असतांना आईचा साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला आणि त्या रोडवर पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी मोहाडी रोडवर घडली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, सुनिता सुर्यकांत शिंपी (वय-४४) रा. दिनकर नगर ह्या आज ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्यासुमारा मुलगा विक्की सुर्यकांत शिंपी (वय-२४) यांच्यासोबत दुचाकीने मोहाडी महिला रूग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी निघाले. मोहाडी रोडवरील लांडोरखोरी येथे सुनिता शिंपी यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागच्या चाकात अडकल्याने त्या धावत्या दुचाकीवरून खाली जमीनीवर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडला. त्यांना खासगी वाहनाने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकी महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आले. तर विक्की शिंपी यांला किरकोळ दुखापत झाली आहे.

 

Protected Content