जळगावातील आरएमएस कॉलनीत बंद घर फोडून ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव प्रतिनिधी । कोल्हे नगर परीसरातील आरएमएस कॉलनीत बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील १० हजार रूपयाची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हे नगर जवळ असलेल्या आरएमएस कॉलनीत राहणाऱ्या ज्योती तायडे ह्या आपल्या दोन मुलांसह राहतात. गेल्या आठदिवसांपासून ज्योती तायडे ह्या त्यांच्या आशाबाबा नगर येथील सासरच्यांकडे साफसफाई करण्यासाठी गेल्या होत्या. काल २२ ऑक्टोबर गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्या आरएमएस कॉलनीतील त्याच्या घरी आल्या. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात जावून पाहणी केली असता घरात ठेवलेले १० हजार रूपयांची रोकड आणि विक्रीसाठी आणलेलया ३० हजार रूपये किंमतीच्या नव्या साड्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. सोबत तीन ग्रॅमचे दागीने आणि चांदीच्या दोन भाराचे जोडवे चोरट्यांनी पोबारा केला.

ज्योती तायडे यांनी तत्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. रामानंदनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. तायडे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content