सलमाच्या हत्येसाठी ३० लाखांची सुपारी

मेरठ । उत्तर प्रदेश पोलिसांनी पकडलेल्या गँगस्टरने आपण अभिनेता सलमान खान याला मारण्यासाठी ३० लाखांची सुपारी घेतली होती असा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी अलीकडेच कंकरखेडामध्ये दीड लाखांचा इनाम असलेल्या शिव शक्ती नायडूला एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले. मात्र, त्याचा साथीदार रवी मलिक उर्फ भूरा तेथून निसटला होता. रवी हा पुष्प विहारमध्ये असल्याचे पोलिसांना समजले होते. त्याला घेण्यात आले. याप्रसंगी जोरदार चकमक झाली. यात रवीच्या पायाला गोळी लागली. यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला कोठडी सुनावण्यात आली असून चौकशीत त्याने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहे.

रवी मलीक याने पोलिसांना माहिती दिली आहे की, त्याने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून आठ कोटी रुपये लुटले होते. यानंतर रवीने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरासोबत मिळून सलमान खानला कायमचे संपविण्यासाठी ३० लाख रूपयांमध्ये सुपारी घेतली होती. ५ जानेवारी २०१८ मध्ये काळवीट प्रकरणात सलमान खान न्यायालयात हजर राहणार होता. तेव्हाच त्याचा गेम वाजवण्याचा रवी आणि त्याच्या साथीदारांचा प्लॅन होता. मात्र काही कारणास्तव हे झाले नसल्याची माहिती त्याने दिली. दरम्यान, रवी मलिक याच्या गौप्यस्फोटाने बॉलीवुडमध्ये खळबळ उडाली आहे. सलमानला मारण्याची धमकी लॉरेन्स बिश्‍नोई या डॉनने दिली होती. आता रवीच्या दाव्यामुळे त्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

Protected Content