पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात रंगली विद्यार्थ्यांची दारु पार्टी !

daru

 

पुणे (वृत्तसंस्था) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांची दारु पार्टी रंगल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या वसतीगृहामधील ५२१ क्रमांकाच्या खोलीमधून आवाज येत होता. त्यामुळे काही विद्यार्थी बघण्यास गेले. त्यांनी दरवाजा ठोठावला. त्यानंतर सुरक्षारक्षकांना बोलावले. परंतू तरी देखील दरवाजा कुणीही उघडत नव्हते. शेवटी सुरक्षारक्षकांनाही काचा फोडून दरवाजा उघडला. त्यावेळी 3 विद्यार्थी खोलीमध्ये पार्टी करत असल्याचे आढळून आलेत. याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.

Protected Content