मुंबई वृत्तसंस्था । पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८८.६४ रुपये असून डिझेलचा भाव प्रती लीटर ७९.५७ रुपयांवर कायम आहे. गुरुवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली होती.
कंपन्यांनी मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. तर गुरुवारी पेट्रोल ९ पैसे तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त केले होते. आज इंधन दर जैसे थे ठेवल्याने दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.९९ रुपये झाला आहे.