आता पश्चिम बंगाल काँग्रेस रियाच्या बाजूने मैदानात

 

कोलकाता , वृत्तसंस्था । काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून नुकतीच जबाबदारी घेतलीय. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर काही तासांतच त्यांनी ड्रग्ज गुन्ह्यातील आरोपी अभिनेत्री व अभिनेता सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची बाजू घेतलीय. त्यांनी रिया ही ‘बंगाली ब्राह्मण महिला’ असल्याचं म्हटलंय. सुशांतला न्याय मिळवून देण्याची व्याख्या, बिहारसाठी न्यायाची व्याख्या असायची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

सुशांतसिंह राजपूत हा भारतीय अभिनेता होता. पण भाजपाने निवडणुकीत फायदा घेण्यासाठी त्याला बिहारी अभिनेता करून टाकले, अशी टीका करत त्यांनी अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. हे केवळ निवडणुकीतील फायद्यासाठी करण्यात आलंय. रियाच्या पित्यालाही आपल्या मुलांसाठी न्याय मागण्याचा अधिकार आहे. मीडिया ट्रायल आपल्या न्यायिक प्रणालीचा बेकार हिस्सा आहे. सर्वांना न्याय मिळणं हाच आपल्या संविधानाचा मूळ सिद्धांत आहे’ असंही अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं.

रियाच्या अटकेचा उल्लेख त्यांनी ‘भयानक घटना’ असा केलाय. ‘रिया चक्रवर्तीनं कुणालाही आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं नव्हतं. तीनं कोणताही आर्थिक अपराध केलेला नाही. तिला एनडीपीएस अर्थात नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्स्टन्स अधिनियमानुसार अटक करण्यात आलीय. असं करून आपल्या राजकीय नेत्यांना खूश करण्यासाठी केंद्रीय एजन्सीनं आपली भूमिका निभावलीय. समुद्र मंथनानंतर त्यांनी अमृताऐवजी ड्रग्जचा शोध लावलाय’ असं म्हणत अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय भाजप सरकारवर टीका केलीय

Protected Content