Home Cities पाचोरा जारगाव चौफुली येथे शेतकऱ्यांच्या हितार्थ एक तास रास्ता रोको आंदोलन

जारगाव चौफुली येथे शेतकऱ्यांच्या हितार्थ एक तास रास्ता रोको आंदोलन


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत असुन बळीराजा संकटात सापडलेला असतांना देखील त्यांचे बाजुने कल्याणकारी निर्णय घेतला जात नसल्याने १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेसच्या वतीने शहरातील जारगाव चौफुली येथे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेचे अध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, उबाठा सेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, अॅड अभय पाटील, युवा उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, जयसिंग (कारभारी) परदेशी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दिपक परदेशी यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकरी बांधव या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound