सरस्वती विद्या मंदिरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) येथील सरस्वती विद्या मंदिरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वहस्ते लॅपटॉप, मग्निफाईर, मनी प्रिंट, स्पीकर,सूर्यमाला,पृथ्वी गोल,कुलर, कोड सुटकेस,मोबाईल, यांच्या प्रतिकृती बनविले. तसेच त्यात लपलेले विज्ञान माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रतिकृतीचे ग.स.अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांनी कौतुक केले. तर रोहन वाघ याने बनवलेल्या कुलर प्रतिकृतीला शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांनी शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून दिले. विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञान, विज्ञानाचे महत्व समजावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उज्वला ब्राम्हणकर यांनी केले. सहकार्य निलिमा भारंबे, सुदर्शन पाटील, मयुर कणखर यांचे लाभले.

Protected Content