सरपंच परिषदेच्या यावल तालुका अध्यक्षपदी संदीप सोनवणे यांची निवड

यावल, प्रतिनिधी | सरपंच परिषद (मुंबई) महाराष्ट्र प्रदेशच्या यावल तालुका अध्यक्षपदी वढोद्याचे सरपंच संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे यांची निवड झालेली असून महिला महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी हंबर्डीच्या सरपंच सौ. अलका शिरीष चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.

 

नुकतीच यावल तालुका शेतकी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच परिषदेची यावल तालुका बैठक परिषदेचे जिल्हा समन्वयक युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. उपस्थित सरपंचांना म्हणून पुरुष व महिला अशा दोन वेगवेगळ्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा समन्वयक बाळू धुमाड, श्रीकांत पाटील, बाळू चव्हाण तसेच यावल पं. स. गटनेते शेखर सोपान पाटील हे उपस्थित होते.
सरपंच परिषद ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची नसून सर्वपक्षीय असल्यामुळे या संघटनेत पक्षपात केला जात नाही. असे जिल्हा समन्वयक युवराज पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात सांगत परिषदेचे ध्येय-धोरणे स्पष्ट केली. त्याचप्रमाणे खालील प्रमाणे पुरुष व महिला कार्यकरणी निवड करण्यात आलेली आहे.

पुरुष कार्यकारणी संदीप प्रभाकर सोनवणे (अध्यक्ष) भूषण नंदकिशोर पाटील व सय्यद असद सय्यद जावेद(उपाध्यक्ष)अजय बाळू अडकमोल (सचिव) दीपक चौधरी (संघटक) समाधान धनसिंग पाटील (सहसंघटक) भागवत शंकर पाटील (कार्याध्यक्ष) विलास नारायण अडकमोल (प्रसिद्धीप्रमुख) प्रताप पंडितराव सोनवणे (कोषाध्यक्ष) तर पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील (मार्गदर्शक) तर सदस्य म्हणून जलिल सत्तार पटेल, राकेश सुधाकर तळेले, मोहन एकनाथ सपकाळे, आकाश लोटू धनगर,नवाज बिस्मिल्ला तडवी, दिपक वामन इंगळे,राजेंद्र रामराव पाटील निवड करण्यात आलेली आहे.

महिला कार्यकारिणी अलका शिरीष चौधरी (अध्यक्ष) सोनल रामदास पाटील व रुखसान फिरोज तडवी (उपाध्यक्ष) पोर्णिमा राकेश भंगाळे (सचिव) मंजुषा विलास साळुंखे (कार्याध्यक्ष) नंदा गोपाळ महाजन (कोषाध्यक्ष) अल्काबाई मधुकर पाटील (सहसचिव) सुमित्रा अनिल साळुंखे (संघटक) हमीदाबी पिरम पटेल (सहसंघटक) सुनंदा संजय पाटील (प्रसिद्धीप्रमुख)संगीता नितीन चौधरी (मार्गदर्शक) तर कार्यकारिणीत सदस्य म्हणून वर्षा अजय पाटील, सुनिता अनिल साळुंखे, शरीफाबी तायर तडवी,मिनाक्षी गोविंद पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.  निवड झालेल्या दोघं कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा तालुक्यात स्वागत करण्यात येत आहे.

Protected Content