रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू; म्हसावद जवळील घटना

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावदजवळ रेल्वे रुळावर रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील म्हसावद जवळ रेल्वे रुळावर रेल्वेच्या धडकेत अंदाजे ३० ते ३५ वयाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणालाशेख शब्बीर रज्जाक यांनी जिल्हा रुग्णालात दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार करीत आहेत.

Protected Content