Home Cities जळगाव दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा!; राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा!; राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रातील कथित शासकीय गैरव्यवहार, जप्त वाहन हस्तांतरण प्रकरणातील चौकशी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी तक्रारदार योगेश नरहरी बुडुखले यांनी जळगावचे उपवनसंरक्षक यांना निवेदन देत सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. संबंधित वनपालाची वैद्यकीय रजा अमान्य करून त्यांना वैद्यकीय मंडळासमोर हजर करण्यासह, चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

योगेश बुडुखले यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जप्त करण्यात आलेल्या वाहनाचे मूळ मालकाची पडताळणी न करता कथितपणे बेकायदेशीर हस्तांतरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वनपाल अनिल विश्राम साळुंके यांच्याविरुद्ध चौकशी सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सहाय्यक वनसंरक्षक कार्यालयाने २० जुलै २०२६ रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने चौकशीच्या दिवशी खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून रजेचा अर्ज दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही रजा चौकशी टाळण्यासाठी घेतल्याचा दावा करत, ती तात्काळ अमान्य करून संबंधित कर्मचाऱ्याला जिल्हा शल्यचिकित्सक अथवा वैद्यकीय मंडळासमोर तपासणीसाठी पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९७९ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ चा उल्लेख करत, संबंधित कर्मचारी चौकशीस गैरहजर राहिल्यास उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे एकतर्फी चौकशी पूर्ण करून दंडात्मक कारवाई करावी, अनधिकृत गैरहजेरीचा कालावधी ‘डाईज-नॉन’ घोषित करावा, वेतन रोखावे आणि आवश्यक असल्यास निलंबनासह कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय, जप्त ट्रॅक्टर प्रकरणात कथित नियमबाह्य कामकाज करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून वाहन परत मिळावे, राखेची कथित चोरी तातडीने थांबवावी आणि शासनाचे नुकसान रोखावे, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. तक्रारदार योगेश बुडुखले यांनी संबंधित मागण्यांवर नियमानुसार कारवाई न झाल्यास मंगळवारी दुपारी १२ वाजता जळगाव येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर कुटुंबीय व समर्थकांसह सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा दावाही त्यांनी निवेदनात केला आहे.


Protected Content

Play sound