नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चिनी सैन्य आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान आज शहीद झाल्यानंतर लागलीच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदलांची बैठक बोलावली आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची संरक्षण सेवा प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह तिन्ही सेना प्रमुखांसोबत बैठक सुरु आहे. सोमवारी रात्री गलवान खो-यात दोन्ही देशांच्या सैन्य अधिका-यांमध्ये चर्चा सुरू असताना सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली. त्यात भारतीय लष्कराचे अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही उपस्थित आहेत. विशेष म्हणजे लडाख सीमेवर भारत आणि चीनमधील वाद बर्याच काळापासून सुरू आहे.