भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हाअध्यक्षपदी जितेंद्र चौधरी

 

 पारोळा : प्रतिनिधी । तालुक्यातील मुंदाणे प्र अ येथील   ए टी पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक  जितेंद्र  चौधरी यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हाअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले  सहावर्षापासून ते पारोळा तालुका भाजप शिक्षक आघाडीचे तालुका अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत. या काळात त्यांनी वेळोवेळी पक्ष आदेश व शिक्षकांच्या विविध समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने केली आहेत. त्यांच्या कार्याची दखल पक्षाने घेऊन त्यांची शिक्षक आधाडीच्या जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

 

जिल्हाअध्यक्ष पदावरून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी व  हक्कासाठी  तत्पर राहू   प्रसंगी रस्त्यावर उतरून शिक्षकांना न्याय मिळवून देऊ असे   या नियुक्ती प्रसंगी  जितेंद्र चौधरी यांनी सांगितले . जितेंद्र चौधरी यांच्या जिल्हाअध्यक्षपदी नियुक्तीचे माजीमंत्री गिरीश महाजन, माजी खासदार ए टी पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे, ऍड किशोर काळकर, प्रदेश उपअध्यक्ष स्मिता वाघ, भाजप शिक्षक आघाडी प्रदेश अध्यक्ष कल्पना पांडे, जिल्हा उपअध्यक्ष रेखा चौधरी, जि प अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजप आमदार, नगराध्यक्ष करण पाटील, रमेश परदेशी, तालुकाध्यक्ष ऍड अतुल मोरे यांनी स्वागत  केले आहे.

Protected Content