बोदवड, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयाने संत गाडगेबाबा जयंती साजरी न केल्यामुळे येथील अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली आहे.
बोदवड तालुक्यात विविध ठिकाणी संत गाडगे महाराज यांचा जयंतीनिमित्त स्वच्छतेचे संदेश देऊन साजरी करण्यात आली. पण बोदवड शहरातील सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांना आपले कार्यालय रामभरोसे सोडून कार्यालयात एकही व्यक्ती हजर नसल्याचे दिसून आलतयादे खळबळ उडाली आहे.
या संदर्भात सामाजिक वनीकरण विभागाला भेट दिली असता त्या ठिकाणी एकही कर्मचारी आढळून आला नाही याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण श्री. दीक्षित यांच्याशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
या ठिकाणी कार्यालयातील बाहेर असलेला बाहेरील व्यक्ती यांच्याशी चर्चा केली असता मी कर्मचारी नसून मला या गोष्टीचं कोणतीही माहिती नाही मी रोजंदारी म्हणून काम करतो याठिकाणी सकाळपासून आलो आहे पण संत गाडगे महाराज कार्यालयात साजरी न झाल्याचे त्यांनी सांगितले
याबाबत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन असणे, नागसेन सुरळकर, सचिन उगले, सतीश बावसकर व सुरेश कोळी यांनी तहसिलदाराकडे या विषयाचे निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.