धक्कादायक : कैद्याकडून पोलीसांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न; स्वत:वरही केले वार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंगझडती घेण्याचा र‍ाग आल्याने कैद्याने कारागृहातील पोलीस शिपायावर शिवीगाळ अरेरावी करत हल्ला करत स्वत:वरही वार करून घेतल्याची धक्कादायक घटना बुधवार २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव जिल्हा कारागृहात घडली. याप्रकरणी हल्ला करणार्‍या कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , जळगाव जिल्हा कारागृहात पोलीस शिपाई राम घोडके हे सुभेदार सुभाष खरे, कुलदीपक दराडे, निवृत्ती पवार, नीलेश मानकर , रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे हे बुधवारी सायंकाळी ६ वाजता बॅरेकमध्ये जाऊन कैद्यांची अंगझडती घेत होते. यादरम्यान एका बॅरेकमध्ये   कैदी सचिन दशरथ सैंदाणे याची अंगझडती घेण्यासाठी गेले. त्याने अंगझडतीत विरोध करत कर्मचाऱ्यांना अरेरावी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली .  त्यानंतर लोखंडी पत्रा कर्मचाऱ्याला मारत स्वत च्या डोक्यात पत्र्याने वार करून घेतले व दुखापत केली. घटनेची माहिती मिळाल्यावर सर्कल जेलर एस.पी पवार यांनी कारागृहात भेट दिली तसेच गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले. याप्रकरणी पोलीस शिपाई राम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैदी सचिन सैंदाणे याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सचिन सैंदाणे हा शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात  २५ सप्टेंबर २०१६ पासून जळगाव जिल्हा कारागृहात असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान कारागृहातील या घटनेने खळबळ उडाली आहे.

Protected Content