बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेला प्रतिसाद

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संवाद यात्रेच्या सहाव्या दिवशी मनूर खु, मनूर बु, नांदगाव, नाडगाव गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेत आहे.

याप्रसंगी रोहिणी खडसे-खेवलकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून आणि विकासात्मक दृष्टीने घेतलेला बोदवड तालुका निर्मितीचा घेतलेला निर्णय बोदवड तालुकावासियांसाठी फार मोठी उपलब्धी आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला. तालुका निर्मितीने बोदवड शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती सह अन्य कार्यालयाच्या प्रशस्त इमारती उभ्या राहिल्यात. यामुळे लोकांची शासकीय कामे सुकर होऊ लागली. नाथाभाऊंचे व्हिजन घेऊनच आपण पक्षाचे काम करत असल्याचे सांगितले.

आता सध्या कोणत्याही निवडणुका नसताना केवळ समस्या जाणून घेण्यासाठी सौ रोहिणीताई यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या 182गावातील नियोजित संवाद यात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी बोदवड उपसा सिंचन योजनेचे काम फक्त नाथाभाऊच पूर्ण करू शकतात असा विश्वास डॉ काजळे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा शाखाध्यक्ष अमोल शांताराम जाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी ही जनसंवाद यात्रा आहे. गेले तिस वर्षात नाथाभाऊ यांनी या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली अजून सुद्धा राहिलेले कामे पूर्ण करण्यासाठी नाथाभाऊ, भैय्यासाहेब, माझा सतत पाठपुरावा सुरू आहे. हा मतदारसंघ स्व.प्रल्हाद पाटील, स्व.हरिभाऊ जावळे, महामहिम माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना मानणारा शांतताप्रिय मतदारसंघ आहे. हि शांतता टिकवून आपल्याला विकास साधायचा आहे.

यात्रेत राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस संदिप पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,बोदवड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील, नगरसेवक भरत पाटील, जाफर शेख, दिपक झंबड, हकीम बागवान, मुजमिल शाह, माजी पं.स. सभापती किशोर गायकवाड, भागवत टिकारे, जिवन राणे, अनिल वराडे, अनिल पाटील, दिपक वाणी, युवक तालुकाध्यक्ष विनोद कोळी, गोपाळ गंगतिरे, सम्राट पाटील, निलेश पाटील, शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, डॉ.ए.एन. काजळे, ज्ञानेश्वर पाटील, विजय चौधरी, सतिष पाटील, जितेंद्र पाटील, प्रमोद धामोळे, रामराव पाटील, रवी खेवलकर, श्याम पाटील, फिला राजपूत, आनंदा पाटील, नईम बागवान, निलेश माळी, गजानन पाटील, भगत पाटील, मुकेश कर्हाळे, कृष्णा पाटील, अजयसिंग पाटील, प्रदिप साळुंखे, अतुल पाटील, विकास पाटील, बाळाभाऊ भालशंकर, रणजित गोयनका, रवींद्र दांडगे, साहेबराव पाटील, बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे, चेतन राजपूत, लता सावकारे, वंदना पाटील, प्रतिभा खोसे, कविता गायकवाड, अश्विनी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content