चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अखेर तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंत रस्त्याच्या जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर झालेल्या निधीतुन रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामास आजपासून सुरूवात करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव हा सुमारे चार किलो मिटरच्या मार्गावरील रस्त्याची मागील काही दिवसापासुन ठीकठिकाणी मोठमोठे सोड्डे निर्माण होवुन अत्यंत दयानिय अवस्था झाली होती . यावेळी या रस्त्याच्या झालेल्या बिकट अवस्थेकडे वेळी वेळी ग्रामस्थानी लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते तर भिम आर्मी या सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन राज्य सचिव सुपडु संदाशिव, रमाकांत तायडे, डोली श्रीकांत वानखेडे यांनी रस्ता रोको आंदोलन देखील केले होते.

यावेळी आंदोलनक्रर्त्यांना जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील ( छोटु भाऊ ) यांनी रस्त्याच्या कामास आपण करू असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचा शब्द पाळीत अखेर आज १४ लाख रुपये निधीतील डांबरीकरण रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात पाटील यांच्या हस्ते भुमिपुजन व कुदळ मारून करण्यात आले.

या प्रसंगी भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत , बोराळे गावाचे उपसरपंच नितिन राजपुत , देवचंद कोळी, चंद्रकांत तेली, प्रेमराज चौधरी, दिपक वानखेडे, सुधीर चौधरी, भिमआर्मीचे राज्य सचिव सुपडु संदाशिव,रमाकांत तायडे, नंदन तायडे, करण ठाकरे, संदीप वानखेडे, शिवाजी गजरे यांच्यासह कॉन्ट्रक्टर चेतन आर पाटील यांच्यासह चुंचाळे व बोराळे गावातील ग्रामस्थ प्रामुख्याने या प्रसंगी उपस्थित होते. रस्त्याच्या उर्वरीत भागाची देखील तात्काळ दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

Protected Content