सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर यूनिटीचे आयोजन

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६ वी जयंतीनिमित्त सावदा नगरपरिषदेतर्फे रन फॉर यूनिटी  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आ. गं. हायस्कूल येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्यधिकारी किशोर  चव्हाण तसेच सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर शहीद अब्दुल हमीद स्मारक व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मानवंदना देण्यात आली.   नंतर बस स्टँड परिसरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्याधिकाऱ्यांनी  मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी  सी. सी सपकाळे ,नगरसेविका विजय जावळे, रंजना भारंबे, पिंटू धांडे, जितेंद्र भारंबे,संजय महाजन, नंदकुमार पाटील, सरदार वल्लभभाई पटेल उत्सव समिती अध्यक्ष सौरभ नेमाडे, उपाध्यक्ष पृथ्वी भंगाळे, सचिव अक्षय भंगाळे,  प्रसिद्ध प्रमुख कौशल धांडे, भेरुलाल पाटील, उमेश भारंबे, तुषार बोंडे आदी उपस्थित होते.

 

Protected Content