Home क्राईम यावल शहरात एकाच दिवशी पाच ठिकाणी घरफोडी 

यावल शहरात एकाच दिवशी पाच ठिकाणी घरफोडी 


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात एकाच रात्री पाच बंद घर फोडून सोन्याचे दागिने, रोकड असा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आले आहे.

 

दिवाळीची सुटीमुळे यावल शहरात चोरट्यांनी धुमाकुळ घातले आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल शहरातील गणपतीनगरातील रहिवाशी अरमान तडवी, बालाजी सिटीमधील कल्पना कुंभार, गजानन सिटीमधील भाजीपाला विक्रेते नेहते यांचे बंद घर आणि दयानगर परिसरात प्रजापती ईश्वरीय कार्यालयासह विस्तारीत वसाहती मधील नागरिक हे दिवाळी निमित्ताने बाहेर गावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. तसेच इतर ठिकाणी झालेल्या घरफोडीत कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समोर आले आहे.

 

गेल्या दोन दिवसाच्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात चोरटे सक्रीय झाल्याचे दिसुन येत आहे. वाढत्या घरफोडीच्या घटनामुळे नागरीकांमध्ये भिती व असुरक्षत्रेची भावना निर्माण झाली आहे.  पोलीस प्रशासनाने शहरासह विस्तारीत वसाहतीच्या क्षेत्रात काळजीपुर्वक रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरीकांकडून होत आहे. काही दिवसापुर्वी फैजपुर मार्गावरील एका गोदामाला चोरट्यांनी लक्ष केले होते. त्या चोरीचा तपास अद्याप लागला नसतांना पुन्हा शहरात पाच ठीकाणी घरफोडी उघडकीला आले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound