नवाब मलीक यांच्यावरील कारवाईचा निषेध

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी निषेध करून प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिले आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई आकसापोटी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात येत असून ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ निवेदने देण्यात येत आहेत. या अनुषंगाने या कारवाई विरोधात बोदवड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करून गुरुवारी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटलेा आहे की, नवाब मलीक यांना कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता होत असलेल्या कारवाईबाबत केंद्रातील भाजपचे सरकारमार्फत केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून या स्वायत्त केंद्रीय यंत्रणाही भाजपच्या हातचे बाहुले बनल्या आहे. भाजपच्य एकाही नेत्यावर कारवाई होत नाही, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणूण टाकला.

यावेळी मधुकर राणे, कैलास चौधरी, किशोर गायकवाड, वामन ताठे, विनोद कोळी, डॉ.ए.एन. काजळे, भागवत टीकारे, भरत पाटील, जफर अल्ताफ, प्रतिभा खोसे, अनिता इंगळे, कविता गायकवाड, संगीता बावस्कर, सचिन राजपूत, अक्षय चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content