शिवसेना नेत्याच्या घरावर आयकर खात्याची छापेमारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवाब मलीक यांच्यावरील कारवाईनंतर आज पहाटे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती तथा शिवसेने नेते यशवंत जाधव यांच्या निवासस्थानावर छापे मारल्याचे वृत्त आहे.

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यशवतं जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या घरावर आयटीने आज सकाळीच छापेमारी केली आहे. त्यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतील मोठा घोटाळा बाहेर काढू, असं म्हटलं होतं. त्यानंतर ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे. त्यांनी काही बोगस कंपन्यांद्वारे मनी लॉंडरींग केल्याचा आरोप झाला होता. याचप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही.
नवाब मलीक यांच्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या अनेक नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे दावे भाजप नेते करत असतांना आज पहाटेच्या छापेमारीवरील ही कारवाई खळबळ उडाली आहे.

Protected Content