भुसावळ, प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रेरणेतून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर गोरगरीब मजूर कामगार निराधार यांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मंगळवार ३१ मार्चपासून अन्नदान करण्यात येत आहे.
खासदार रक्षाताई खडसे यांनी सुरु केलेल्या अन्नदानाच्या उपक्रमास रेल्वेच्या आयआरसीटीसी विभागाचे सहकार्य मिळात आहे. दररोज १५०० फूड पॅकेट या उपक्रमांतर्गत वितरित करण्यात येणार आहे. यानुसार मंगळवार दि. ३१ मार्च रोजी नगरसेवक बोधराज चौधरी, नगरसेवक राजूभाऊ नाटकर, नगरसेविका सोनीताई बारसे यांच्या प्रभागांमध्ये अन्नदान करण्यात आले, आजपासून १४ एप्रिलपर्यंत म्हणजेच लॉक डाऊन असेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. आजच्या अन्नदानाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ. सुनील नेवे, शहर अध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस पवन बुंदेले, अनिकेत पाटील, राजू खरारे, सुमित बऱ्हाटे, पृथ्वीराज पाटील, संतोष बारसे, गिरीश महाजन, नंदकिशोर बडगुजर, नारायण रणधीर, विनू रणधीर, बिसन गोहर आदी पदाधिकारी उपस्थित होते.