हतनूरचे ३६ दरवाजे उघडले

hatnur dharan

भुसावळ, प्रतिनिधी | धरण परिसरात रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे ३६ दरवाजे सकाळी १० वाजेपर्यत पूर्णपणे उघडण्यात आलेत. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणाची आजची पाणी पातळी सकाळी ८ वाजता २१०.४२० क्युसेस इतकी होती. साठवण २१०.८० क्युसेस तर ४ हजार १७५ क्युसेस पाणी विसर्ग करण्यात आले.    सकाळी ९ वाजता पाण्याची पातळी २१०.३२० क्युसेस तर साठवण २१६.८० क्युसेस तर ३९६३ क्युसेस विसर्ग करण्यात आले.  सकाळी १० वाजता पाणी पातळी २१०.५० क्युसेस, साठवण २०४.५० क्युसेस ,कालव्यातून ८५० क्युसेस असे एकूण ३ हजार ८२५.५० एवढया पाण्याचा  विसर्ग करण्यात आला आहे.

Protected Content