Home Agri Trends भुसावळातील बियाणी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण

भुसावळातील बियाणी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण

0
111
biyani school
biyani school

biyani school

भुसावळ प्रतिनिधी । येथील बियाणी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात सोमवारी १५ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय शिक्षा समितीचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी यांच्याहस्ते वृक्ष लागवडीची सुरवात करण्‍यात आली.

उपस्थित प्रवीण भराडीया यांच्याहस्ते सुद्धा वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यमासाठी शाळेतील लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वन्य प्राण्यांचे पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या मोहीमेत १५० वृक्षारोपण करण्‍यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सिस यांनी शालेय विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसाच्‍या निमित्ताने एक झाड लावावे व प्रत्येक परिवाराने एक झाड लावा आणि जीवन वाचवा असा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound