वादग्रस्त महिला अधिकारी भाग्यश्री नवटकेंची जळगाव अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

navatake

मुंबई (वृत्तसंस्था) अॅट्रोसिटी करण्यासाठी आलेल्या दलित-मुस्लिम लोकांना फोडून काढण्याची भाषा करणाऱ्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर माजलगावच्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षक भाग्यश्री नवटके यांची पोलीस प्रशासनाने औरंगाबादला बदली केली होती. त्यानंतर आज पोलीस प्रशानासाने काढलेल्या आदेशानुसार नवटके यांची जळगाव अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक असे की, डिसेंबर २०१८ मध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी कार्यरत असताना महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांना दलित बांधवांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे भोवले होते. त्यानंतर राज्यात मोठे वादळ उठल्यानंतर त्यांची बदली औरंगाबादला करण्यात आली होती. त्यांच्यासंदर्भातली एक व्हायरल क्लिप समोर आली होती. या क्लिपमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते, असे त्या म्हणताना दिसत होत्या. आत्तापर्यंत अशा २१ जणांना मी चांगलेच फोडून काढले आहे असेही त्या म्हणतांना क्लीपमध्ये दिसून येत होत्या. क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठे वादळ निर्माण झाले होते. नवटके यांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये मराठा, दलित असा उल्लेख होता. दरम्यान, बाबूराव पोटभरे यांनी भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन पोलीस सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. संबंधित याचिका प्रलंबित असल्याचे कळते.

काय होते क्लिपमध्ये?
या क्लिपमध्ये भाग्यश्री नवटाके या तुम्ही मराठा आहात म्हणून मी केवळ तुमच्या पाठीवर मारते. जर दलित असतात तर मी त्यांना फोडून काढले असते. एका प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मी कशी मदत केली आणि दलित जातींच्या लोकांना कसा धडा शिकवला, याविषयी त्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगताना दिसत होत्या. व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सर्वच स्तरांतून टीका झाली होती. तसेच पोलीस दलातील जातीय वादाची कीड याविषयावर मोठी चर्चा देखील झाली होती.

नंदूरबार जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकपदी
नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संजय पाटील यांची धुळे येथील राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशनपदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या जागी आता गडचिरोली येथील अपर पोलीस अधिक्षक पंडीत एम. कमलाकर यांची नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय पोलीस सेवेतील 37 जणांच्या बदल्या आज राज्य गृहविभागचे उपसचिव यांनी बदली व नियुक्तींचे आदेश काढले. भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिक्षक व तत्सम अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश नुकतेच काढण्यात आले. यात राज्यातील एकुण 37 अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्ती करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांची बदली अमरावती येथे राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक म्हणून नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

Protected Content