आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या जिल्हा दौर्‍यावर

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमिवर आरोग्य मंत्री राजेश टोपे हे बुधवारी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून ते लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेणार असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करणार आहेत.

आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे हे बुधवारी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. ते आज पहाटे दोन वाजता अजिंठा विश्रामगृहात येणार आहेत. सकाळी नऊ वाजता ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देणार आहेत. यानंतर ते प्रतिबंधीत क्षेत्राला भेट देऊन पाहणी करणार आहेत. सकाळी दहा वाजता जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात ते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सोबत बैठक घेणार आहेत. यानंतर ते जिल्ह्यातील अधिकार्‍यांसोबत बैठक घेतील. तर नंतर ते आयएमएच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करणार आहेत. दुपारी एक वाजता ते भुसावळ येथील प्रतिबंधीत क्षेत्राला भेटी देणार असून तेथील अधिकार्‍यांसोबत चर्चा करून ते अकोला येथे प्रयाण करणार आहेत.

Protected Content