खा. उन्मेष पाटील यांच्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या मृत्यूचे प्रमाण भयावह पातळीवर पोहचल्याने खासदार उन्मेषदादा पाटील यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे चिंता व्यक्त केली होती. याची तातडीने दखल घेण्यात आली असून जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रतिकाराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या मृत्यूचे प्रमाण अतिशय चिंताजनक पातळीवर पोहचले आहे. यातच सोमवारी दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हयातील नागरिकांमध्ये आरोग्य यंत्रणेने विषयी भय निर्माण झाले होते. या अनुषंगाने आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी तातडीने पंतप्रधान कार्यालयाकडे वाढत्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य विभागाने तातडीने येत्या पाच तारखेला केंद्रीय पथक पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिली आहे.

खासदारांनी केली तक्रार

जिल्हयात २ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर वीस दिवसांनी दुसर्‍या रुग्णाची नोंद झाली होती. मात्र मे महिन्यात आजवर ७६२ रुग्णांची नोंद झाली त्यात ९४ कोरोंना बाधितांचा मृत्यू झाला. काल तर एकाच दिवशी १३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे मालेगाव यांच्या तुलनेत जळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू चे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये चिंता वाढली असताना लोकप्रतिनिधी विषयी देखील नागरिकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे यामुळे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज सरळ पंतप्रधान कार्यालयाकडे आरोग्य प्रशासनाविषयी तक्रार केली. आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोंनाबाधितांच्या मृत्यू आणि त्यांना देण्यात येणार्‍या आरोग्य सुविधेतील उणिवा विषयी चिंता केली होती त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

आरोग्य विभाग होणार जागा

खासदार उन्मेश दादा पाटील पंतप्रधान कार्यालयाकडे वाढत्या मृत्यूदराबद्दल तक्रार केली होती त्याची गंभीर दखल घेण्यात आली. तात्काळ केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अगरवाल यांनी येत्या पाच तारखेला कुणाल कुमार यांच्या नेतृत्वात केंद्रीय पथक पाठविण्यात येईल असा संदेश दूरध्वनी वर खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिला. आरोग्य प्रशासनाची तपासणी करून यंत्रणेचा अहवाल केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे देणार असल्याने या पथकाकडे जनतेचे लक्ष लागून आहे तर खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केलेल्या तक्रारीमुळे हे पथक येणार असल्याने आता आरोग्य विभाग खडबडून जागा होईल अशी आशा कोरोना बाधित , संशयीतांचे नातेवाईक तसेच जिल्हा वासीयांमध्ये व्यक्त होत आहे.

Protected Content