कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात न जात घरी ; प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ

यावल प्रतिनिधी । येथील गंगानगरातील एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णास न्हावी येथील कोवीड सेंटरवरून पुढील उपचारासाठी गोदावरी रुग्गालयात पाठवले. तेथे उपचारासाठी दाखल न होता परस्पर घरी निघुन आल्याने रहिवाश्यांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचेकडे तक्रार केली असता पाटील यांना तातडीने यावल परिषदेस कळवून पुढील कार्यवाहीचा आदेश दिला.

शहरातील गंगानगरातील ७० वर्षीय रुग्ण हे ५ एप्रील रोजी कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्याने त्यांना फैजपुर ( न्हावी )येथील कोवीड सेंटरला पाठवण्यात आले मात्र श्वासोस्वास घेण्यास त्यांना त्रास होत असल्याचे दिसून आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला तेव्हा रुग्गाच्या नातेवाईकांनी गोदावरी रुग्णालयात येथे नेले असता तेथून वृध्दाने दवाखान्यात दाखल न होता परस्पर घरी निघुन आल्याने गंगानगर परीसरातील रहीवाशी घाबरले.

माजी नगराध्यक्ष तथा प्रभागाचे नगरसेवक अतुल पाटील यांचेशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधुन सर्व घटनेची माहिती दिली असता त्यांनी परिषदचे कार्यालयीन अधिक्षक विजय बडे यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले असता बडे यांनी आरोग्य अधिकारी शिवानंद कानडे, योगेश मदने, रविंद्र काटकर संदिप पारधे, रामदास घारू ,लखन घारु , विश्श्वनाथ गजरे यांनी धाव घेत रुग्नासह घरातील सर्व सदस्यांंची अँटीजन रॅपीड तपासणी घेत रुग्गास होम कॉरंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे . नगरपरिषद ने तातडीने दखल घेतल्याने परीसरातील रहीवाश्यानी सुटकेचा श्श्वास सोडला. तरी ही अनेक वेळा तपासणी केल्यावर निगेटीव्ह आलेली व्याक्ती ही पॉझीटीव्ह आल्याचे प्रकार घडले असुन, नगर परिषद व आरोग्य प्रशासनास या संदर्भात अधिक सर्तक राहावे लागणार आहे

 

Protected Content