बंगलोर येथे धाडसी चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंगलोर शहरातील महालक्ष्मीपुरम भागातील घरात धाडसी दरोडा टाकून तब्बत साडे पाच किलो सोने व रोकड मिळून २ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयांचा डल्ला मारून गोरखपूरमार्गे नेपाळ पसार होणार्‍या कुविख्यात दरोडेखोराला भुसावळातील सतर्कत रेल्वे सुरक्षा बलाने एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेसच्या डब्यातून रावेरातून  अटक केली. संशयीताकडे ३ हजार ९०० रुपयांचे नेपाळी चलन व भारतीय चलनाचे १४ हजार रुपये जप्त करण्यात आले. उपेंद्र प्रदीप शाही (वय-३५, रा.पनाथूर, मेन रोड, शोभा ड्रीम इकर, बंगलोर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात नऊ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

याबाबत आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना यांच्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त एच. श्रीनिवास राव यांनी माहिती दिली की, महालक्ष्मीपुरम बंगलोर येथे संशयित उपेंद्र शाही व त्याच्या साथीदारांनी मोठा दरोडा टाका असून त्यातील मुख्य संशयित एलटीटी-गोरखपूर या गाडीने जात आहे. ही गाडी गुरूवार, १६ रात्री ११ वाजता भुसावळ जंक्शनवरील प्लॅटफॉर्म 5 वर आली असता, आरपीएफ निरीक्षक मीना व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक के.आर.तरड, उपनिरीक्षक एन.के. सिंग, उपनिरीक्षक सुभाष राजपूत आणि कर्मचारी यांनी गाडीची तपासणी केली मात्र संशयीत गवसला नाही, यामुळे निरीक्षक मीना यांनी अधिकारी, कर्मचारी यांचे चार जणांचे पथक धावत्या गाडीत पाठविले. गाडीची तपासणी करीत असतांना संशयीत ए-1 या डब्यात बसलेला आरपीएफला दिसला. आरपीएफजवळ असलेल्या फोटो व संशयीत एकच असल्याची खात्री झाल्यावर गाडी रावेर स्थानकावर थांबल्यावर संशयीताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पथकातील उपनिरीक्षक के.आर.तरड, महेंद्र कुशवाह, के.एस.वसावे, विनोद कुमार आणि ए.ए.हंसराज वर्मा यांनी अन्य गाडीने संशयिताला भुसावळात आणले.

 

संशयीत उपेंद्र प्रदीप शाही याला ताब्यात घेूवन चौकशी केली असता  बंगलाोर येथून चोरी करून पसार झालेल्या शाही याच्या सोबतच्या तीन ते चार चोरट्यांनी चोरीतील माल आपसात वाटून घेतला.  भुसावळ आरपीएफने पकडलेल्या संशयीत शाही याच्या विरूध्द मुंबई, बंगलोर, मंगळूर, सूरत, वर्सोवा, कोसंबा (सूरत), अप्पर पेठ, वाशी, कुकटपल्ली येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Protected Content