ठाकरे व राऊतांबाबत आक्षेपार्ह लिखाण; पहूरला गुन्हा दाखल

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गोद्री येथील एकाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्याबाबतचे आक्षेपार्ह फोटो व लिखाण सोशल मीडियात प्रसारीत केल्यावरून त्याच्या विरूध्द पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील गोद्री येथील दिवाकर पाटील नामक व्यक्तीने आपल्या स्मार्टफोनवरून शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दैनिक सामनाफचे संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबद्दल आक्षेपार्ह फोटो शेअर करून लिखाण केले होते. यामुळे या मान्यवरांची बदनामी झाल्यामुळे त्याच्याविरोधात पहूर पोलिस ठाण्यात शिवसेना शहर शाखेच्या वतीने आज सायंकाळी पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेशी यांना कारवाईबाबत निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश परदेशी यांना निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आरोपी दिवाकर पाटील यांना अटक करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांची टीम रवाना करण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बळीराम बारी यांच्या तक्रारीवरून पहूर पोलिस ठाण्यात दिवाकर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत निवेदन सादर करताना शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी विभाग प्रमुख व पत्रकार गणेश पांढरे, शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव, गणप्रमुख अजय जाधव, भाऊराव गोंधनखेडे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content