स्मशानभूमितून चक्क अस्थींचीच चोरी !

मुक्ताईनगर छबीलदास पाटील । शहरातील स्मशानभूमितून मयत महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्या अस्थीची चोरी झाल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली असून यामुळे तिच्या आप्तांनी प्रशासनाच्या विरूध्द आक्रोश व्यक्त केला आहे.

बर्‍हाणपूर रोडवर असलेल्या हिंदू स्मशानभूमीतून अस्थि चोरीस गेल्याची धक्कादायक घटना दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. प्रशिक नगरातील रहिवासी असलेल्या ६५ महिला कोविडचा उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्यावर दि.९ सप्टेंबर ला रात्री १२:३० वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर दि.१० रोजी रात्री ८ वाजेपर्यंत नातेवाईकांनी पार्थिव व्यवस्थित जळाले की नाही हे तपासले असता अस्थी व्यवस्थित होत्या. मात्र शुक्रवारी सकाळी मुलगा नितीन सुधाकर भालेराव व इतर नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आले असता अस्थी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या प्रकाराने महिलेचे नातेवाईकांनी यांनी प्रचंड आक्रोश व संताप केला. त्यामुळे विधी कशावर आणि कसा करायचा खोळंबला अशी संतप्त भावना व्यक्त करू लागले. अखेरीस नातेवाईकांनी स्मशानभूमीतच आंदोलन सुरू केले. तसेच नातेवाईकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली असता आमदार पाटील लागलीच स्मशानभूमीत पोहोचले. कुटुंबीय व नातेवाईकांच्या भावना जाणून घेत मुख्याधिकारी अश्‍विनी गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळुंके यांना लागलीच घटनास्थळी प्राचारण केले. आणि मुख्याधिकारी व पोलीस उपनिरीक्षकांना गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करीत अस्थि चोरणार्‍या भुरट्या चोरांचा तात्काळ शोध घेण्याचा सूचना केल्यात. आणि भालेराव कुटुंबियांची चर्चा करून त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

Protected Content