वृध्दाने संपविली आपली जीवनयात्रा; कारण अस्पष्ट

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील बांबरुड (महादेवाचे) येथे एका ६५ वर्षीय वृद्धाने घराच्या छताला गळफास लावत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज १२ डिसेंबर रोजी उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील बांबरुड (महादेवाचे) येथील रहिवाशी सुकलाल नामदेव बागुल (वय – ६५) या वृद्धाने आज १२ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावत आपली जीवनयात्रा संपवली. सदरचा प्रकार नातेवाईक व ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. पाचोरा येथील रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल सुकलाल बागुल यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सुकलाल बागुल यांना मृत घोषित केले. सुकलाल बागुल यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नसुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अशोक पाटील हे करीत आहे.

Protected Content