संचारबंदीचे उल्लंघन; मनवेल येथील ७० जणांवर गुन्हा

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल गावात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीचे नियम तोडून सार्वजनिक ठिकाणी अनेक नागरीक गोळा करून गोंधळ घातल्याप्रकरणी ७० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनवेल तालुका यावल येथे आज१४ जुन रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास मनवेल गावातील सिद्धार्थनगर परिसरात राहणाऱ्या अवंतीकाबाई इंधाटे यांच्या घरासमोर अगंणात प्रतिभा मोरे (पुर्ण नाव माहीती नाही) अनुसुचित जाती महीला अध्यक्ष काँग्रेसपक्ष यांच्या सोबत भुषण शिवाजी साळुंखे रा. किनगाव भिम आर्मी, गणेश सपकाळे रा. किनगाव तालुका यावल तसेच जळगाव, भुसावळ, रावेर, किनगाव, यावल येथील २० ते३० जणांनी व इतर अज्ञात ६० ते ७० जणांनी मनवेल गावातील सुनिता विकास अडकमोल, प्रशांत सुनिल सोनवणे , निखिल प्रशांत भालेराव अशा या सर्व मंडळींनी सोशल डिस्टन्सिंग न ठेवता, तोंडाला मास्क न एका लावता टीव्ही चॅनलला बाईट दिल्याचा कार्यक्रम घेवून संसर्गजन्य रोग पसरेल असे कृत्य केले. यावल पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी संदीप छगन भोई यांनी फिर्यादीवरून ७० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content